स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तांची कमतरता

    38

    ✒️अतुल बडे(परळी,विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405

    अंबेजोगाई(दि.19ऑक्टोबर):-शहरातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचार घेतात, त्यापैकी बरेच रुग्णांना रक्त लावण्याची आवश्यकता भासते, मात्र रुग्णालयाच्या रक्तपेढीत रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्ताची मागणी केली असता प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांना आधी रक्तदान करा मगच तुमच्या रुग्णाला रक्त मिळेल अथवा नाही,असे सांगण्यात येत. आश्या कितीतरी रुग्णाच्या तक्रारी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती कडे रुग्णाच्या नातेवाईकां कडून करण्यात आल्या.

    त्यासाठी आम्ही रुग्णालय प्रशासनास स्वतः रक्तदान करून अशी विचारणा करतो कि एवढ्या सेवाभावी संस्थांनी, पक्ष, संघटनांनी शिबिराच्या माध्यमातून दान केलेले रक्त अखेर जाते कुठं ? खाजगी रक्तपेढीतून रक्त आणा असे प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकास का सांगण्यात येते ? जर एखाद्या रुग्णासोबतचा नातेवाईक वृद्ध, अशक्त असेल तर त्यालाही हीच अट घातल्या जाते ? हे योग्य आहे काय ?मा. अधिष्ठाता साहेब,,, आपण सामान्य नागरिकांच्या या तक्रारी कडे लक्ष देणार का?असा प्रश्न मोहंमद ताहेर मोहंमद सत्तार(मराठवाडा संपर्क प्रमुख-
    अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, महाराष्ट्र राज्य) यांनी केला.