रयत शेतकरी संघटना अध्यक्ष अँड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात कार्यकत्यांनी संघटीत व्हावे – गणेश ढाकणे

28

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.20ऑक्टोबर):-रयत शेतकरी संघटना अध्यक्ष अँड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि.20 रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर गेवराई तहसील कार्यालवर दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रयत शेतकरी संघटनेचे गढी सर्कल प्रमुख गणेश ढाकणे यांनी केले आहे.

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसान ग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी मंगळवार दि.20 रोजी रयत शेतकरी संघटना अध्यक्ष अँड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार.

असून त्यानंतर शासकीय विश्रागृहावर गेवराई येथे बीड जिल्ह्यातील सर्व रयत शेतकरी संघटनेचे सर्कल पातळीवरील व कार्यकर्त्याची महत्व पूर्ण बैठक होणार असून यामध्ये बीड जिल्ह्यातील संघटनेच्या काही पदाधिकारी निवडी बापुसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या होणाऱ्या आंदोलनासाठी व बैठकीसाठी सर्व कार्यर्कत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रयत शेतकरी संघटनेचे गढी सर्कल प्रमुख गणेश ढाकणे यांनी केले आहे.