भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन

97

🔹महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा

🔸भाजपची मागणी

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.20ऑक्टोबर):-भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने तहसिल कोरपना येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. श्रीमती यशोमती ठाकूर महिला व बालकल्याण तसेच पालकमंत्री असताना एका पोलीस शिपायाला मारहाण प्रकरनात कोर्टाने त्यांना तीन महिने सजा व पंधरा हजार रुपये दंड ठोठावला असताना मंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही.

तरी त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अन्यथा यापुढे सुद्धा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पदाधिकारी श्री नारायण हिवरकर भाजपाध्यक्ष तालुका कोरपना,श्री अरूण मडावी सरपंच,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष कोरपना,श्री नूतन कुमार जीवनी पंचायत समिती सदस्य,श्री विजयजी रणदिवे सरपंच,श्री प्रमोदजी कोडापे सरपंच,श्री दिनेशजी खडसे युवा मोर्चा,श्री निखिलजी भोंगळे,श्री अशोक तोडासाम,श्री जगताबजी,रामा पेंदोर आधी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून निदर्शने आंदोलन करण्यात आले.