प्रणाली व प्राची मेश्राम या गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार

32

🔹शिक्षक भारती व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणने घरी जाऊन केले अभिष्ठचिंतन

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.20ऑक्टोबर):-अलिकडेच घोषित झालेल्या NEET परीक्षेमध्ये चिमूर तालुक्यातील प्रणाली किशोर मेश्राम हिने ५२० गुण प्राप्त करीत एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता पात्र ठरली.ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,दीक्षाभूमी,नागपूर या महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील तथा शिक्षकांना दिले आहे.डॉक्टर होऊन गोरगरीबांची सेवा करण्याचा मानस तिने यावेळी बोलून दाखवला.तिचे वडील जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे.

याच दिवशी जाहीर झालेल्या निकालात प्राची किशोर मेश्राम ही जेईई मेन्स ॲडव्हान्स परीक्षेत यश प्राप्त करुन ती दिल्ली IIT अभ्यासक्रमाकरिता पात्र ठरली आहे.प्राचीने अथक परीश्रम घेऊन हे यश पादाक्रांत केले आहे.प्राची दिशा सायन्स व कॉमर्स महाविद्यालय,वरोरा येथील विद्यार्थीनी आहे.

प्रणाली आणि प्राची या दोन्ही गुणवंत विद्यार्थीनींचा त्यांचे घरी जाऊन शिक्षक भारती व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणतर्फे सन्मानपत्र व पुस्तक देऊन ह्दय सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रणाली व प्राचीचे वडील किशोर मेश्राम,आई वनमाला,आजोबा देवाजी मेश्राम,शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष तथा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणचे सचिव सुरेश डांगे,विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,चिमूर तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे,सचिव कैलाश बोरकर,बंडू नन्नावरे,मिलिंद रामटेके,मनोज राऊत आदी उपस्थित होते.