अर्हेरनवरगावच्या नदीपात्रात रेती तस्करांचा महापूर

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.21ऑक्टोबर):- चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेती तस्करांची कोंडी झाली असून महसूल अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना हातासी धरून मंडल नावाच्या रेती तस्कराने ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगावच्या नदीपात्रात रात्रीच्या वेळेस तांडव सुरु केले आहे. वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करीत. रात्रीच्या 12 वाजताच्या नंतर ट्रॅक आणि ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु असल्याने, अर्हेरनवरगावच्या तसेच ब्रम्हपुरी येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळेस रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक आणि ट्रॅक्टरच्या आवाजामुळे नागरिकांची झोपमोड होत असून आणि त्यांच्या वाहनाच्या वेगाने नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होत असल्याने याचा ताबडतोब बंधोबस्त करावा अशी मागणी अर्हेरनवरगावच्या , कूर्झ्याच्या व ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिक करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे.