गडचांदूर ते आवारपूर रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी

22

🔸सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

✒️संतोष मडावी(कोरपना प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि 21ऑक्टोबर):- गडचांदूर-बिबी-नांदाफाटा-आवारपूर  ८ किमी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.गडचांदूर-बिबी-नांदाफाटा-आवारपूर हा ८ किमी राज्य मार्ग अतिशय खराब झाला असून या रस्त्यावरून वर्दळ करणे जोखमीचे झाले आहे. गडचांदूर-बिबी मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहे. काही जणांचे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव पण गेले आहे. रोज किरकोळ अपघात होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

       या रस्त्यावरून खूप मोठी वर्दळ असते. याच मार्गावरून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची वाहने सुद्धा ये-जा करतात. रस्त्यावरून पादचाऱ्यांना वाटचाल करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्यावर कच्चे मटेरियल टाकल्यामुळे रस्ता आणखी खराब झाला असून वाहने स्लीप होत आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहे. आपणास नम्र विनंती आहे कि, येत्या ८ दिवसात रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा बिबी गावकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर, निवृत्ती ढवस, शामकांत पिंपळकर, नरेंद्र अल्ली आदींनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचांदूर यांना दिला आहे.