मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत बोरगडी येथील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट

30

🔹एक कि .मी लांबीचा रस्ता व नालीचे बांधकाम अपूर्ण

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.21ऑक्टोबर):- तालुक्यातील बोरगाडी येथील लक्ष्मी नगर ते बोरनगर पर्यंत ७ कि.मी लांबीचा रस्ता व नाली मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत मंजूर झाली व त्याचे त्या रस्त्याचे बांधकाम गजानन कन्ट्रक्शन कंपनीने ठेका घेऊन काम केले .रस्त्याचे बांधकाम झाले आणि तो रस्ता काही कालावधीतच भेगा पडू लागला आहे. तसेच रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. या शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात बांधकाम करण्यात आलेले नाही.

या बांधकामावरुन रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे .तसेच १ कि.मी लांबीचा रस्ता व रस्त्याच्या बाजूकडील नालीचे बांधकाम आजपर्यंत पूर्ण झाले नाही.या बांधकाम करणाऱ्या दोषी कंपन्यांना चौकशी करून दोषींवर कारवाई कार्यवाही करावी तसेच अपूर्ण असलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे.

असे निवेदन मा. कार्यकारी अभियंता पंतप्रधान सडक योजना कार्यालय यवतमाळ यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.या निवेदनावर पांडुरंग व्यवहारे, शरद ढेंबरे ,संजय पाईकराव, संतोष गायकवाड इत्यादी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.