संजय गांधी निराधार योजना कोरपना तालुका अध्यक्षपदी उमेश राजुरकर

35

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.22ऑक्टोबर):-संजय गांधी निराधार योजनेच्या कोरपना तालुका अध्यक्षपदी निमणी ग्रामपंचायतचे उपसरपंच उमेश राजूरकर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष पदावर पहिल्यांदाच युवकाला संधी मिळाल्याने युवकांमध्ये नवचैतन्य आहे.

समिती सदस्यपदी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव मिलिंद ताकसांडे, पिंपळगावच्या सरपंच रेखा घोडाम, प्रमोद पिंपळशेंडे, विलास आडे, अनिल निवलकर, अंकुश वांढरे, अब्दुल हाफिज अब्दुल गणी, कल्पना अरुण निमजे, सोहेल आबीद अली यांची निवड करण्यात आली.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार व आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या शिफारशीवरून निवड करण्यात आली. नवनिर्वाचित समितीच्या निवडीबद्दल कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, ज्येष्ठ नेते श्रीधरराव गोडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, पंचायत समिती सभापती रूपाली तोडासे, उपसभापती सिंधुताई आस्वले, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, माजी सभापती शाम रणदिवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे, माजी सभापती नोगराज मंगरूळकर, धनंजय गोरे, पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती संभाशिव कोवे, नामदेवराव येरणे, पापय्या पोन्नमवार, आशिष देरकर, विक्रम येरणे, अभय मुनोत, शैलेश लोखंडे,विजय बोरडे, गणेश गोडे, सतीश बेतावर, मसूद सय्यद व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.