आदिवासी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला खावटी कर्ज मिळवून देणार – आमदार संतोषराव बांगर

29

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.22ऑक्टोबर):- शिवसेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह ,कळमनुरी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोषराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मा.संतोषराव बांगर म्हणाले, कळमनुरी मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी समाजाच्या व्यक्तीला २५ हजार रूपये पर्यंत खावटी कर्ज आणि घरकुल मिळून देणार तसेच पुढील एक वर्षात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणणार.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले,नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे ,तालुकाप्रमुख सखाराम उबाळे ,शहरप्रमुख संतोष सारडा,युवा सेना जिल्हा प्रमुख बाजीराव सवंडकर, रामभाऊ कदम,गुड्डू बांगर, ॲड रवि शिंदे ,अरविंद पाटील, शिवराज पाटील,बबलु पत्की, मयुर शिंदे ,दादाराव डुरे, अतुल बुर्से,बाळू पारवे,राजू संगेकर, संभाजी सोनुने,मारोतराव खांडेकर,रामराव मस्के ,साहेबराव जाधव ,बाळू ससे,नारायण साळवे,अयाज पठाण ,रवि आप्पाराव शिंदे,कांता पाटील शामराव फटींग ,बाळासाहेब पतंगे,गणेश जाधव ,पप्पु वीर,गजानन शिंदे पुयनेकर,शिवम नाईक ,विलास मस्के ,शैलेश ढाले,अतुल वाघमारे ,बाबूराव सुकळकर,ईश्वर तरटे,अविनाश पतंगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिव सेना, युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.