विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडू नका

31

🔹अन्यथा टोकाची भूमिका घेतली तर प्रशासन जबाबदार राहील

🔸संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल ढेपे यांचा निर्वाणीचा सल्ला

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.22ऑक्टोबर):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग तीन चार वेळा वेळापत्रक मध्ये बदल करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक ओढताना झाल्याने वास्तव चित्र आपल्याला पाहायला मिळत असतांना पुन्हा विद्यापीठाने व विद्यार्थ्यांना सुरुवात केली. आज पासुन सुरू झालेल्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये online पध्द्धत वापरण्यात आली. त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे ID login होत नसल्यामुळे बाब समोर आली आहे.

सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या पेपरची वेळ संपत आली आहे तरी देखील विद्यार्थी त्यावर login होऊ शकले नाही , काहीच login झाले परंतु Examstart झाली तर त्यांच्या अभ्यास क्रमाच्या प्रंश्रपत्रिका मिळता नसल्याने दि. 20 ऑक्टोबर 2020 ला M. Com ( 2 nd Year IV sem ) ची परीक्षा ही सकाळी 10 वाजता सुरू होणार होती. पण आम्ही आज सकाळी 10 वाजता पासून आपल्या अमरावती विद्यापीठाने दिलेल्या अँप मध्ये लॉग इन करत आहो एकतर कधी लॉग होत नाही आहे आणि समजा कदाचित लॉग इन झालं तर Start Exam होत नाही आहे.

परीक्षेच्या हेल्पलाईन नंबर वर कॉल केल्यावर ते असे सांगतात आपण आज दिवसभर त्या अँप मध्ये लॉग इन करत रहा व start exam वर click करत रहा. आपली परीक्षा सुरू होईल पण आता 2 वाजत आले साहेब तरी सुद्धा अँप मध्ये लॉग इन होत नाही आहे. साहेब आज पहिलाच पेपर होता तो सुद्धा होण्याची चिन्ह विद्यापीठाद्वारे दिसत नाही आहे.

अजून बाकी पेपर ला सुद्धा असा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपणास साहेब विनंती करत आहे की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना अश्या येणाऱ्या समस्यांचे आपण निराकारण करावे व आपण अमरावती विद्यापीठाला आपल्या अँप मध्ये ज्या काही त्रूट्या असतील त्या दूर कराव्या लावाव्या या वर योग्य तो उपाय विद्यापीठाने काढावा .अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ असे मत विद्यार्थी प्रतिनिधी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे कुणाल भाऊ ढेपे यांनी वक्त केली.