महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ चिमुरच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

27

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.22ऑक्टोबर):- महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ तालुका शाखा चिमुरच्या वतीने आयु. किशोर मेश्राम यांचे घरी जाऊन त्यांच्या दोन्हीं सुकन्या कु.प्रणाली किशोर मेश्राम ही नीट परीक्षा उत्तीर्ण करून(520गुण) एमबीबीएस साठी पात्र ठरली,तर कु.प्राची किशोर मेश्राम ही जेईई ऍड व्हान्स आयआयटी साठी पात्र ठरली,तसेच आयु. अनिल गेडाम यांची सुकन्या कु.अपेक्षा अनिल गेडाम ही सुद्धा नीट परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानिमित्ताने संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे विभागीय सचिव किशोर नागदेवते, अध्यक्ष विनोद गेडाम,उपाध्यक्ष देवानंद गेडाम, महासचिव प्रकाश कोडापे,कार्याध्यक्ष सिद्धार्थ जिलटे,कार्यालयीन सचिव संजय मेश्राम, माधव बन्सोड, नथु रामटेके,अविनाश शंभरकर केंद्रप्रमुख,यशवंत सूर्यवंशी अनिल गेडाम,किशोर मेश्राम आणि संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेकडून प्रणाली,प्राची,अपेक्षा यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.