महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे वीर बाबुराव शेडमाके शहीद दिन साजरा

35

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.22ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ तालुका शाखा चिमुरच्या वतीने 1857 च्या लढ्यातील भारताचे आद्य क्रांतिकारक वीर शहीद बाबुराव शेडमाके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिमूर येथील नवीन पोलीस स्टेशन जवळील स्मारकात जाऊन वीर बाबुराव शेडमाके यांच्या फोटोला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी संघटनेचे विभागीय सचिव किशोर नागदेवते, अध्यक्ष विनोद गेडाम,उपाध्यक्ष देवानंद गेडाम, महासचिव प्रकाश कोडापे,कार्याध्यक्ष सिद्धार्थ जिलटे,कार्यालयीन सचिव संजय मेश्राम, माधव बन्सोड, नथु रामटेके,अविनाश शंभरकर केंद्रप्रमुख, यशवंत सूर्यवंशी अनिल गेडाम,किशोर मेश्राम आणि संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे महासचिव प्रकाश कोडापे यांनी सर्वांचे आभार मानले.