एक नविन कोरी मराठी वेबसिरीज “दैना” दसराच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला

30

✒️विजय कांबळे(विशेष प्रतिनिधी)मो:-8454021607

मुंबई(दि.22ऑक्टोबर):-चित्रपट क्षेत्रात सध्या चित्रपटगृहाला अजून शासनाने पुर्णता परवानगी दिली नसुन, तरी सुद्धा येत्या काही दिवसात रसिक प्रेक्षकासाठी घेऊन येत आहे, गौरीपुर चित्र प्रोडक्शन निर्मित “दैना” मराठी वेबसिरीज.

या वेबसिरीज कथा अशी आहे की ,आई व मुलाच्या जीवनाची दैना कशा प्रकारे होते ते या वेबसिरीजच्या माध्यमातून नविन कोरी कथा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. “दैना” या वेबसिरीज कथेत कलाकार अनुपमा पाटील, संभाजी तांगडे (सैराट फेम), सुमेध, उत्तम दादा शिंदे, दिग्ददर्शक सुमेध व दिपक, कथा-पटकथा-संवाद अनुपमा पाटील, गीत व संगीत सोनु साठे, विशेष मार्गदर्शक बाबासाहेब कोतोलिकर व इतर सहकार्य.हि एक अत्यंत सांजेशी मनाला भिडणारी कथा आहे.

ह्या वेबसिरीज साठी सर्वांनी अतिशय मेहनत घेतली आहे. तरी हि “दैना” वेबसिरीज रसिक प्रेक्षकांसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच२५ऑक्टोबर रोजी आपल्या समोर सादर होणार आहे. तरी आपण ही वेबसिरीज नक्की बघा व युट्युब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो !आपले महत्त्वाचे कमेंट करायला मात्र विसरू नका.