अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी

25

🔸मांडवा,सांडवा,धनसिंगनगर येथील शेतकऱ्याचे उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.22ऑक्टोबर):- मांडवा ,सांडवा,धनसिंगनगर येथील अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता विभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात
मागील महिन्याभरापासून परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने मांडवा, सांडवा धनसिंगनगर येथील शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून कर्जाचा डोंगर वाढतच आहे.

नुकताच परतीचा पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचून अनेक शेतकऱ्याची सोयाबीन पाण्यात गेले आहे .तर कापूस पिकाचे कापसाची बोंडे खाली गळून पडत आहेत . दरवर्षी काहीना काही नैसर्गिक आपत्ती होत असून शेतकऱ्यांची नुकसान होत आहे. या नुकसानीचा घटनास्थळावरून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी . अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदनाच्या प्रती मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा. जिल्हाधिकारी यवतमाळ,मा. इंद्रनीलजी नाईक आमदार, तहसीलदार साहेब पुसद यांना देण्यात आल्या.

या निवेदनावर दिपक डोळस, अरविंद राठोड , गोदाजी सुपले, दत्तराव पुलाते पो.पा.मांडवा, नामदेव राठोड , लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले , विजय राठोड, अरविंद क.राठोड , राम राठोड , नितीन पुलाते , दशरथ राठोड , झेड. एम. राठोड, वसंत आडे, सुधाकर चव्हाण, नामदेव राठोड ,सुनील राठोड, प्रवीण घुक्से , विनोद राठोड , केशव मोरे, विठ्ठल ढगे, शरद साखरे इत्यादी शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत .