ओल्या दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट पन्नास हजार रुपये भरपाई द्या

33

🔸शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर संभाजी ब्रिगेड बीड चे धरणे आंदोलन

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.२२ऑक्टोबर):-मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यासाठी संभाजी ब्रिगेड केजच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकाचे सोयाबीन, ऊस,मका,मूग,उडीद,कापुस पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना पंचनामे याद्या या सर्व भानगडीत न पडता सरसगट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.

तसेच शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा लागू करून लवकरात लवकर वाटप करण्यात यावा यासाठी उद्या दि.22/10/2020 रोजी सकाळी 11 वाजता पासून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या केज तालुक्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, संदीप शितोळे, किरण खोडसे,अंकुश मुळे, प्रेमकुमार खोडसे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, जिल्हा सचिव विलास गुंठाळ,तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, वीर भगत सिंह विद्यार्थी परिषद जिल्हा अध्यक्ष योगेश अंबाड,तालुका अध्यक्ष विशाल देशमुख,छावा जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे, संभाजी ब्रिगेड चे शशिकांत इंगळे,गजानन अंबाड,प्रवीण खोडसे,विष्णू आबा थोरात,संदीप शितोळे,ऋषिकेश गलांडे,हर्षवर्धन खोडसे, संदीप थोरात, शरद खोडसे,धीरज खोडसे,शेखर थोरात,अप्पासाहेब खोडसे,दयानंद करपे,युवराज मगर,धर्मराज सोळंके,पत्रकार दत्तात्रय मुजमुले, आदी मान्यवर उपस्थित होते.