माजी मंञी पंकजाताई मुंढे याच्या समोर हिरापुर च्या शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या

30

🔹शेतकऱ्यांचा समस्या सोडवण्यासाठी राज्य सकारला धारेवर धरणार – माजी मंञी पंकजाताई मुंढे

✒️गोपाल भैया चौव्हान(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.23ऑक्टोबर):-माजी मंञी पंकजाताई मुंढे यानी गेवराई तालुक्यातील आगर नांदुर, धोडराई आणी हिरापुर येथे ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. आणी शेतकर्यासोबत संवाद साधला यावेळी हिरापुर येथे शेतकर्यानी आवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसानी बद्दल पिक विमा व अनुदानाचे वाटप करावे अशी मागणी माजी मंञी पंकजाताई मुंढे याच्याकडे केली, यावेळी आमदार ॲड लक्ष्मण अण्णा पवार , बीड भाजपा जिल्हाअध्यक्ष राजेंद्र भैय्या मस्के उपस्थित होते.

आवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान संदर्भात ओला दुष्काळ पाहणी दौरा करण्यासाठी माजी मंञी पंकजाताई मुंढे नेत्या गेवराई तालुक्यातील आगर नांदुर धोडराई आणी हिरापुर येथे आल्या होत्या.दुष्काळ पाहणी दौरा केल्या नंतर भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच अमोल तिपाले यानी आयोजन केलेल्या हिरापुर येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात उपस्थित राहिल्या, माजी मंञी पंकजाताई मुंढे यानी हिरापुर येथे बैलगाडी प्रवास केला.

लोकनेत्या माजी मंञी पंकजाताई मुंढे यांच्या समोर शेतकर्यानी समस्याचा पाढा वाचला शेतकरी महादेव मुंजाळ ,पुंजाराम सोनसाळे,कौशल्याबाई तिपाले यानी शेतकर्याना वाचवा ताई म्हणत सांगितले की, शेतकर्याच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले असुन पिक विमा व अनुदानाचे तात्काळ वाटप करावे अशी मागणी केली, प्रसंगी आमदार लक्ष्मणराव पवार म्हणाले की, शेतकर्याचे पिक कर्ज बॅक देत नाहीत ,दलालाच्या बॅका झाल्यात शेतकर्याना न्याय देण्यासाठी आघाडी सरकार कमी पडत आहे. प्रशासनावर आघाडी सरकारचा वचक नाही असे ॲड आमदार लक्ष्मणराव पवार म्हणाले.

यावेळी माजी मंञी पंकजाताई मुंढे म्हणाल्या की, शेतकर्याचे दु:ख पुसणासाठी मी बांधवावर जाऊन पिक नुकसान पाहणी केली, आघाडी सरकारकडुन आवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान संदर्भात पिक विमा व अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यासाठी सरकारला धारेवर धरुन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल आहे.शेतकर्याच प्रचंड नुकसान झाले आहे ,शेतकर्याच्या न्याय हक्कासाठी मी प्रयत्नशिल आहे शेतकरी शेतमजुर उसतोङ कामगार याना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आघाडी सरकारला भांडुन प्रश्ण सोडवण्यात येतील असे ही मंञी लोकनेत्या पंकजाताई मुंढे आवर्जून म्हणाले आहेत.

यावेळी आ गोविंद आण्णा केंद्रे,अक्षय भैय्या मुंदडा,मोहण दादा जगताप,केशव आंधळे,रमेश पोकळे,राजाभाऊ मुंढे,जि प सदस्य पाडुरंग थडके सर्जेराव तांदळे,ज्ञानेश्वर खाडे,प्रकाश सुरवसे,भगीरथ बियाणी राजेंद्र बांगर,स्वप्निल गलधर, विजय डरफे, आदी उपस्थित होते, हिरापुर शेतकरी संवाद कार्यक्रमा प्रसंगी भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष तथा युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले, डाॅ. दिनकर तिपाले ,संतोष काळे,संतोष मुंजाळ,गंगाधर जाधव ,सुशिल मुंजाळ गोरख तिपाले,रमेश पवार,रामनाथ तिपाले ,यशवंत मुंजाळ,अनंद जाधव ,प्रेम सोनवने ,जयराम काळे सह शेतकरी शेतमजुर भाजप कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.