”सविंदणे” येथील ‘श्री गुरुदेव दत्त विद्यालया’स ‘ऑनलाईन विश्व मराठी संमेलना’चे निमंत्रण

38

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)मो:-9881292081

सविंदणे(दि.23ऑक्टोबर):-सविंदणे,ता.शिरुर, जि.पुणे येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालय व जुनिअर काॅलेज ऑफ सायन्सला पहिल्या ऑनलाईन विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रण संमेलनाचे प्रतिनिधी डाॅ. नितीन पवार यांच्याकडून देण्यात आले आहे. यावेळी डाॅ. नितीन पवार यांनी माहिती दिली की, 12 कोटी मराठी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्याचा प्रयत्न विश्व मराठी परिषद करत असुन सक्षम,समर्थ आणि समृद्ध अशा वैशिक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न विश्व मराठी परिषद पहात आहे.

त्याच उद्देशाने विश्व मराठी परिषदेने दि.28,29,30 व 31 जानेवारी 2021 या चार दिवसांच्या दरम्यान ऑनलाईन विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे. यामधे एक दिवसाचे स्वातंत्र ‘विश्व मराठी युवक संमेलन’ होणार आहे. 12 कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी वैश्विक स्तरावर असे संमेलन प्रथमच होणार आहे. संमेलन पुर्णतः नि:शुल्क आहे. ‘साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता’ असे संमेलनाचे मुख्य तीन पैलु आहेत. एक दिवस खास युवकांच्या उपक्रमांसाठी राखून ठेवला आहे.

या संमेलनात चर्चा, परिसंवाद सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, कवीकट्टा,वाचन संस्कृती संबंधी उपक्रम, ऑनलाईन वस्तू /ग्रंथ प्रदर्शन, उद्योग – रोजगार संधीची उपलब्धता याविषयीच्या उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इ.बहुविध उपक्रम सादर करण्यात येणार आहेत.या संमेलनात जगभरातील पाच लाखांहून अधिक मराठी भाषिक बांधव सहभागी होणार आहेत.

आतापर्यंत 24 देशांतील (अमेरिका, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड,जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युगांडा,झांबिया, नायजेरिया इ.) महाराष्ट्र मंडळांनी आपला सहयोग दर्शवण्यासाठी लेखी पत्रे दिली आहेत.”ब्रहन् महाराष्ट्र मंडळ आॅफ अमेरिका ” देखील संमेलनामधे सहभागी होत आहे. त्याचबरोबर भारताबाहेरील सर्वात मोठी मराठी भाषिकांची संस्था “मराठी विश्व, न्युजर्सी, अमेरिका ” देखील संमेलनासाठी पुर्णतः सहयोग करीत आहेत. या कार्यक्रमास श्री गुरुदेव दत्त विद्यालयाचे श्री.एन.आर कंठाळेसर, श्री.एस.व्ही. गोफणेसर,श्री.वाय.सी. दुसाणेसर व श्रीमती एस.पी.लंघे मॅडम आदी मान्यवर शिक्षकवर्ग उपस्थित होते.