क्रिडा संकुले उभारणार गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे

64

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.23ऑक्टोबर):-गंगाखेड व पालम येथे क्रिडा संकुलन उभारणीसाठी जागे संदर्भात अधिकाऱ्या सोबत शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे गंगाखेड विधानसभा मतदासंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी , पालम गंगाखेड तालुक्याचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली असून गंगाखेड पालम येथे भव्य क्रीडा संकुल उभा करण्याचा मानस आहे असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

पालम व गंगाखेड येथील क्रीडा प्रेमींना भव्य क्रीडा संकुलानची मागणी बरेच दिवसांची असून या मागणीचा दखल घेवून आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महसूल व क्रीडा क्षेत्रातील अधिकारि यांची बैठक घेण्यात आली. आपल्या मतदार संघात अनेक खेळाडूच्या अंगी अंतर्गतराज्य व आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळ खेळता यावे या साठी क्रिडा संकुलन उभारण्याचा माझा संकल्प आहे अशी भावना व्यक्त केली असुन या दोन्ही भागातील खेळाडूंना मैदानी खेळणा उत्सह निर्माण करण्यासाठी भव्य क्रिडा संकुलनाची आवश्यकता आहे.

असे म्हणाले या वेळी गंगाखेड शिव उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, गंगाखेड चे तहसीलदार स्वरूप कंकाळ, पालम च्या तहसीलदार प्रतिभा गोरे, व क्रीडा क्षेत्रातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.