नवरात्रीत मिसेस मुख्यमंत्रीची अभिनेत्री अमृता धोंगडे हिने साकारली शंकरी रूप

32

✒️विजय कांबळे(विशेष प्रतिनिधी)मो:-8454021607

मुंबई(दि.23ऑक्टोबर):-सध्या घराघरात प्रेक्षकांच्या मनात बसलेली मिसेस मुख्यमंत्री मालिका मधील अभिनेत्री अमृता धोंगडे हिने नवरात्रीच्या उत्सवात अप्रतिम संकल्पना देवी शक्ती च्या रूपात सोशियल माध्यमातून प्रेक्षकां समोर मांडून आपल्या कलाकारीने देवीचे विविध रूप धारण केले आहे.

आतापर्यंत तिने शंकरी, अन्नपुर्णा, सरस्वती, कालरात्री, वरूणी, आणि अपर्णादेवी रूप सादर करून फोटो पोस्ट सध्या सोशल मिडीयावर अतिशय चर्चेत आहे. ह्या कामगिरी साठी अमृताने अतिशय मेहनत घेतली आहे. ही महत्वाकांक्षी संकल्पना आणली ती छायाचित्रकार रोहन डहाळे व प्रकाश दळवी आणि ती अतिशय सुंदर पध्दतीने काम करण्यात आली आहे.

रोहनने अप्रतिम असे अमृताने दिलेल्या देवीच्या रूपातील व्यक्तिरेखा व भावना आणि हावभाव आपल्या छायाचित्रातून फोटो टिपले आहे. ह्या महत्वाकांक्षी संकल्पना साठी देवीचे रूप देण्यासाठी अमृतावर मेकअप आर्टिस्ट हर्षदा रायकर हिने चेहरावर सुंदर व मनमोहक मेकअप केला आहे. तसेच तीला साथ दिली आहे देवीचे वेशभूषा अत्यंत जोमाने केली आहे ती निधी देशमुख (Nora by Nidhi Design Studio). तसेच इतर सदस्यांचा ह्या संकल्पनात वाटा आहे.

अमृता सध्या अजून दसरापर्यत आपले देवीच्या रूपातील भावुक फोटो पोस्ट करणार असून सोशल मिडीयावर सज्ज राहून आपली महत्वाकांक्षी संकल्पना पूर्ण करणार आहे.