प्रकाश व्हाईट गोल्ड जीनिंग येथे कापूस खरेदीला प्रारंभ

30

🔸पहिल्या दिवशी 4725 रुपये प्रति क्विंटल भाव

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.२३ऑक्टोबर):-कृषि उतपन्न बाजार समिती,समुद्रपुर अंतर्गत उबदा येथिल प्रकाश व्हाईट गोल्ड जिनींग, प्रेसिंग येथे आज प्रथम कापूस खरेदी केंद्राचे उदघाटन हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सहकार महर्षि एड सुधिर कोठारी, समुद्रपूर बाजार समिती चे सभापती हिम्मत चतुर च्या हस्ते करण्यात आले.आज आलेलया सर्व कापसाला 4725 रूपये भाव देण्यात आला.

प्रथम आलेले 5 शेतकरी रवि देशकर,प्रमोद गराड, गजानन ढोकपांडे, गणेश चौके, दिनेश महाकाळकर यांचा सत्कार सहकार महर्षि एड सुधिर कोठारी, सभापती हिम्मत चतुर, गणेश डालिया, उद्योगपती ओम डालिया, प्रणय डालिया, यांचे हस्ते शाल व श्रीफळ देवून करण्यात आला.याप्रसंगी शेतकऱ्यांना तसेच वाहन चालकांना शर्टपीस वितरणसुद्धा करण्यात आले.
आज प्रथम दिवशी 50 वाहनाने अंदाजे 500 क्विंटल कापसाची आवक झाली असून कापसात 28 ते 30 टक्के ओलावा आहे.

शासकीय आधारभूत किमत मध्यम कापसाला 5515 रूपये ,लांब धागयाला 5825 रूपये भाव घोषित असताना 4725 रूपये खरेदी करण्यात येत आहे हमी भावात12%ओलावा पाहिजे,परंतु जास्त ओलावा असल्याने हमी भाव देता येत नाही म्हणून शासकीय हमी भावात खरेदी सुरू करावी, अशी मागणी यावेळी शेतकरी करीत आहे. सोयाबीनचे पिक हातातून गेल्याने कापसाला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
पुढे दसरा व दिवाळी सारखे सण आहेत, तसेच रबी हंगामासाठी गहू, हरभरा यासाठी पैश्याची आवश्यकता आहे.

केंद्र शासनाने सी सी आय च्या वतीने शासकीय हमी भावात कापसाची खरीदी शुरू करावी अशी मागणी खविस उपाध्यक्ष सुरेंद्र कुकेकर,शांतिलाल गांधी, शालिक वैद्य, रवींद्र झाडे, केशव भोले,अभय कोठारी, महेंद्र झाडे, अमित कोठारी आदीनी केली आहे.याप्रसंगी अड़ते वसंता चंदनखेडे, रमेश गुप्ता,प्रविण जिकार,हारुल प्रभाकर हरदास,गनी, सुनील डंभारे, प्रकाश पाके, बाजार समितीचे सचिव शंकर धोटे,शेखर राऊत,राजू काळमेघ,योगेश मांडवकर आदी उपस्थित होते.