वीज महावितरण कंपनीचा अजब कारभार

47

🔺संकटाचे अवस्थेत ग्राहकांचे वीज पुरवठा केला खंडीत

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.24ऑक्टोबर):-परतीचा पाऊस आणि कोरोनाने हत्तबल झालेला शेतकरी आर्थिक अडचणीत असताना महावितरण चे अधिकारी आंबडकर आणि अभियंता निंबाळकर तसेच त्यांच्या सर्व टीम ने गावातील विपुरवाठा खंडित केला आणि बोर चे वायर आणि लाईट चे वायर काढून नेले आणि जाळण्यात आले. त्या मुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. खास करून जे व्यक्ती वायर काढत होते त्या वेळी घरातील सर्व मंडळी शेतात गेले होते आणि घरी असणाऱ्या महिलांमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले होते .विशेष म्हणजे त्यातील काही लोक दारू पिऊन आले होते.

शेतकरी संकटात सापडला असताना वीज वितरण कंपनीचे अधिकारी व त्यांच्या पथकाने मानवी दृष्टीकोन गहाण टाकून अमानवीय वृत्ती चे प्रदर्शन करीत वायर काढून जाळले, या प्रकणांची राजकीय पुढारी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन संकटग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे,अशी मागणी पुढे येत आहे.

संकटग्रस्त लोकांचे वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल
स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य चे वतीने जाहीर निषेध केला व प्रदेश अध्यक्ष विजय बडे यांनी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.