शेतकऱ्यांची अचार(लोणचे) सारखी झाली अवस्था

39

🔸पूरग्रस्त शेतकरी अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.24ऑक्टोबर):- तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतजमीन महापुराने व्यापून टाकल्याने आता त्यांची अवस्था लोणचां सारखी झाली आहे. लोणचं समोर ठेवलं आहे पण ते हातात मिळत नाही आहे. फक्त आणि फक्त तोंडाला पाणी सुटत आहे, अशी अवस्था शेतकरी बांधवांची दिसत आहे. कारण दोन – अडीच महिने उलटून सुध्दा शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेतच बसून आहेत.

वैनगंगा नदीला महापूर येऊन दोन – अडीच महिने उलटली तरीपण शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहचली नाही. त्यांना पुरबुडी मिळाली नाही. वैनगंगा जवळचे अर्हेरनवरगाव , पिंपळगाव भोसले, भालेस्वर हा पट्टाच महापुरामुळे व्यापून टाकला होता. नेते येऊन गेले, पदाधिकारी येऊन गेले आणि शेतकऱ्यांना सांत्वना देऊन, आर्थिक मदत तातडीने देवू असे बोलून गेले.

पण तातडीची शेतकऱ्यांची आर्थिक मदत अजूनही पोहचली नाही. तातडीची आर्थिक मदत महापुराने वाहून गेली की काय हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. आता वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या हंगामाची, इकडे कोरोणामुळे काम नाही आणि हाती पैसा नाही. बी – बियाणे शेतात पेरणीची वेळ आली आणि हातात पैसे नाही. शेतकरी मित्र रोजच्या फेऱ्या मारत आहे.

बँकेकडे आज मिळणार पैसे उद्या मिळणार पैसे पण पैसा नाहीच, शेवटी शेतकरी रडतोय त्याचे रडणे दिसते फक्त ते चार निर्जीव भिंतीला, काय करणार ती निर्जीव भिंत, या सर्व गोष्टीची दखल घेत प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत पोहोचवावी अशी ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.