पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

    44

    ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

    गोंडपिपरी(दि.24ऑक्टोबर):- राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सन २०२०-२१ अंतर्गत रोपवाटीका या घटकाकरीता लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

    हा कार्यक्रम राबविताना मार्गदर्शक सुचनांचा काटकोरपणे अवलंब करणेबाबत व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाभ देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. तरी सन २०२०-२१ मधील तालुकानिहाय इच्छुक शेतकऱ्यांचे Maha DBT या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे ऑफलाईन अर्ज करावेत.

    प्राप्त अर्जातुन लक्षांकानुसार सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहेत. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी स्वंतत्र रित्या https://mahadbtmahait.gov.in ऑनलाईन संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी.अधिक माहितीसाठी नजीकच्या मंडळ कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी तसेच संबधीत कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा.

    या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अर्ज स्वीकृतीचा कालावधीत १० दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार सुधारीत अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत दि. ०२ नोव्हेंबर २०२० कार्यालयीन वेळेत सायंकाळी ६.१५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

    जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. योजनेच्या मार्गदर्शक सूचना व अधिक माहितीसाठी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देण्यात यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.