आइकॉन बहुद्देशीय संस्था मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

    80

    ?पवन माटे यांच्या अध्यक्षतेखाली सुमेध लोखंडे यांचे विशेष मार्गदर्शन

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    नागभिड ( दि.25 ऑक्टोबर ):- आइकॉन बहुद्देशीय संस्था र.जी.नं. चं/००००१०/२०१८ एफ नं.००१४८४० ( CDP) तुकुम तह.नागभीड़ जिल्हा चंद्रपुर च्या वतीने जि.प.शाळा तुकुम येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.या शिबिराला प्रामुख्याने गावातील प्रतिष्टित नागरिक मा. गजभे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले.

    तर प्रमुख अतिथि मनुंन मा. चंद्रमनीजी बनकर,मा. शेख सर,मा.पवन माटे(आयकॉन संस्था अध्यक्ष),प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सुमेधजी लोखंडे(kvs Teacher ) मा.रविंद्रजी जांबुळे सर्(मिनाताई विद्यालय नवखळा) हे उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष पवन माटे यानी कार्यक्रमाचे उद्देश्य व गरज तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला,कार्यक्रमाला सखोल असे मार्गदर्शन सुमेधजी लोखंडे यांनीupsc,mpsc,ssc,banking,railway,cgl,mts,district recrutment,police bharti इत्यादि विषयी सखोल मार्गदर्शन केले,रविंद्रजी जांबूळे यानी अभ्यासाचे नियोजन कसे करावे.

    याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले,सेख सरांनी जिद्द,व स्मार्ट वर्क आवश्यक आहे असे सांगितले.जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन श्रीनन्दन गजभे तर आभार परम चौके यानी मानले.