नालंदा ग्रंथालय हे भविष्यात आयएएस घडवणारे केंद्र व्हावे – पो.नि.सुरेश बुधवंत

43

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

माजलगाव(दि.26ऑक्टोबर):-येथील क्रांतीसुर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने काल 25 /10 /2020 रोजी विजयादशमीच्या दिवशी नालंदा वाचनालयाचे उद्घाटन माजलगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की नालंदा ग्रंथालयांमध्ये वाचनालयामध्ये येणारे विद्यार्थी व सर्वच अभ्यासक यापैकी स्पर्धात्मक परीक्षा देऊन आय. ए. एस .,आय. पी.एस., एम.पी. एस. सी.सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन मोठे मोठे ऑफिसर निर्माण व्हावेत असे या वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलून त्या ग्रंथालयाला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड,प्रा.संजय बागुल पत्रकार किशन भदर्गे,पत्रकार,प्रा. सुदर्शन स्वामी, लक्ष्मण पोटभरे सर, साबळे सर,बळीराम माने हे उपस्थित होते या ग्रंथालयाच्या उभारणीसाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीसुर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक मगर ,अश्विन टाकणखार, शत्रुघन कसबे,दिनेश निसरगंध,प्रवीण ओव्हाळ, स्वप्निल स्वामी, आदिनाथ लोखंडे,भैय्या प्रधान, राजरत्न खळगे,केतन प्रधान, सोनपसारे ,संजोग कसबे इत्यादींनी परिश्रम घेतले.
‌