दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यात 5 टक्के निधी जमा करा – शाहू डोळस

34

🔹अप्पर जिल्हाधिकारी बीड यांना प्रहार च्या वतीने निवेदन सादर

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.26ऑक्टोबर):- बीड जिल्हयातील स्थानिक स्ववराज्य संस्थे मधिल ५%निधी हा नगर पालिका,नगर परीषद,नगरपंचायत,जिल्हा ‘परीषद,पंचायत समिती,आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थे मधिल ५%अपंग निधी हा विना विलंब तात्काळ बीड जिल्हयातील अपंगांच्या खातेवर वर्ग करून करोना या महामारीच्या काळात अपंगांची होनारी उपासमार थांबवावी या साठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीड च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मा आघाव पाटील यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यांनी लगेच समंधित खात्याला अपंग निधीचे ताबडतोब वाटप करावे असे आदेशित केले.निवेदन देतांना सोबत शाहु डोळस (जिल्हाउपाध्यक्ष),शेख रहिम(शहरआध्यक्ष बीड)किशोर साळवे,शेख बनेमिया,शोभा मजमुले,शेख शबाना, शेख मामु व इत्तर पदाधिकारी उपस्थीत होते.