आंतरराष्‍ट्रीय परिसंवादासाठी निवड झालेल्‍या घाटकुळ येथील काजल राळेगांवकर हिचे आ. मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन

30

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.26ऑक्टोबर):-युनिसेफच्‍या माध्‍यमातुन आयोजित आंतरराष्‍ट्रीय परिसंवादासाठी निवड झालेली पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ येथील विद्यार्थीनी कु. काजल राळेगांवकर हिचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे कौतुक करत अभिनंदन करण्‍यात आले.
बालकांचे हक्‍क, अधिकार, समस्‍या निवारण तसेच बालकांचे सर्वांगिण विकास यासाठी बाल पंचायतीच्‍या माध्‍ममातुन उल्‍लेखनीय काम करणा-या काजलची आंतरराष्‍ट्रीय परिसंवादासाठी निवड झाली. हा आंतरराष्‍ट्रीय परिसंवाद काजल निश्‍चीतपणे गाजवेल व भारताची विशेषतः चंद्रपूर जिल्‍हयाची मान तिच्‍या कर्तृत्‍वाने अभिमानाने उंच होईल, असा विश्‍वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त करत तिला शुभेच्‍छा दिल्‍या. भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी भेटवस्‍तु देत आ. मुनगंटीवार यांच्‍या वतीने काजलचे अभिनंदन केले.

यावेळी दुरध्‍वनीद्वारे आ. मुनगंटीवार यांनी काजलला शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी भाजयुमोचे प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, अजय मस्‍के यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.