एस. सी. एस. टी व इतर मागास संवर्गातील विदयार्थ्यांना 8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुला – मुलींना टॅब देण्यात यावे – विजयकुमार भोसले

40

🔸सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.27ऑक्टोबर):-एस. सी. एस. टी व इतर मागास संवर्गातील विदयार्थ्यांना 8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुला – मुलींना टॅब देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग राज्य समन्वयक व प्रभारी सातारा जिल्हा यांनी सादर केले.

कोरोना महामारीमुळे सध्याचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शिक्षण पध्दतीने सर्वत्र सुरु आहे. एस. सी. एस. टी व इतर मागास वर्गातील मुलाच्या पालकांचे एवढे उत्पन्न नाही की ते आपल्या पाल्यांना शैक्षणिक कार्ग अॅनरॉइड सुविधाच्या असणारे फोन अथवा टॅब विकत घेऊन न शकतील एवढी त्याची पात्रता नाही.शिवाय या विदयार्थी करीता असणारी शिष्यवृती अजुनही प्राप्त न झाल्याने शैक्षणिक साहित्य सामुग्री त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांचे या वर्षी फार मोठे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका आहे.

निवेदनात जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणुन या कामी लक्ष घालून अत्यंत महत्वाचे व खास बाब म्हणुन विनंती मान्य करून विदयार्थीना आपल्या समाजकल्याण विभागाकडे असणारी आकडेवारी प्रमाणे वाटप तात्काळ करण्यात यावे.अशी विनंती करण्यात आली.

निवेदन सादर करताना विजयकुमार भास्कर भोसले (राज्य समन्वयक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभाग तथा प्रभारी सातारा जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभाग ) यांचे सोबत मनोजकुमार तपासे (अध्यक्ष काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभाग) उपस्थित होते.