बेरोजगार ,भुमिहीन मजुर व असंघटीत कामगार संघाची राष्ट्रीय कोअर कमीटीची महत्वपुर्ण आँनलाईन बैठक

    38

    ?संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा. एस्.एन्. ठाकुर तर राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र विधान भवनचे माजी प्रधान सचिव मा. अनंतजी कळसे सर यांची निवड

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.27ऑक्टोबर):- बेरोजगार ,भुमिहीन मजुर व असंघटीत कामगार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी रणदिवे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

    सदर बैठकीस राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी रजिस्टार तथा संघटनेचे प्रमुख सल्लागार मा. राजारामजी मढव सर , कृषी सल्लागार मा. प्रभाकरजी घाटोळे सर , All India S C/S T & Nav Boudh L.I.C. Empl.Wellfare Asoc.चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा. एस्. एन्. ठाकुर सर , महाराष्ट्र राज्य विधान भवनाचे माजी प्रधान सचिव मा. अनंतजी कळसे साहेब , मा. दिपकजी काळे सर , सचिनजी माने सर , मा. रेखाताई शिंदे मँडम , मा. आक्काताई जाधव मँडम, मा . सुजाताताई गलांडे मँडम, मा. उज्ज्वला ताई घुटुकडे मँडम मा. दाजी शिंदे साहेब आदी राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य मान्यवर उपस्थित होते.

    बैठकीत संघटनेच्या मागील कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच देशावर कोरोनाचे भयानक संकट आलेने उद्योग धंदे बंद पडलेने वाढत्या बेरोजगारीच्या विषयावर चिंता व्यक्त करण्यात आली तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या तसेच बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर आणी महिलांच्या अत्याच्याराच्या व परतीच्या पाऊसा मुळे शेतीचे झालेले अतोनात नुकसान यावर विस्तृत चर्चा करण्यात आली व सदर विषय शासन दरबारी प्रभावी पणे मांडुन पाठपुरावा करणेसाठी व संघटनेतील मरगळ झटकुन संघटन गतीमान करणेसाठी संघटनेत अभ्यासु व कर्तव्य दक्ष व्यक्तीची संघटनेच्या विविध पदावर नियुक्ती करण्याचा ठराव पास करण्यात आला.

    संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा. एस्. एन्. ठाकुर साहेब यांचे निवड करण्यात आली सदर निवडीची सुचना मा. प्रभाकरजी घाटोळे साहेबांनी मांडली तर त्यास मा. राजारामजी मढव सर यांनी अनुमोदन दिले तसेच संघटनेच्या उपाध्यक्ष पदी मा. अनंतजी कळसे साहेब यांची निवड करण्याची सुचना मा. दिपकजी काळे सर यांनी मांडली व त्यास मा. दाजी शिंदे साहेबांनी अनुमोदन देले.

    राष्ट्रीय महसचिव पदाची जबाबदारी जेष्ट नेते मा. पंडीतजी कांबळे साहेब यांचे कडे कायम ठेवणेत आली.तसेच संघटनेचे दैनंदिन कामकाज पहाणेसाठी राष्ट्रीय स्टँडींग कमीटी ची स्थापना करण्यात आली व सदर कमीटीचे चेअरमन पदी मा. दिपकजी काळे साहेब यांची तर सचिव पदी मा. महादेव कांबळे साहेब यांची , खजिनदार पदी सौ. सुजाता गलांडे मँडम यांची , कार्यकारणी सदस्य पदी मा. विजया घुटुकडे मँडम आणी मा. दाजी शिंदे साहेब यांची निवड करण्यात आली सर्व ठराव एकमताने पास करण्यात आले.

    नवनिर्वाचित मान्यंवर पदाधिकारी यांचे कडे 31 डिसेंबर 2021 पर्यत संघटनेच्या वरील पदाचा पदभार असेल व त्यांच्या कार्याचा दर 100 दिवसानी संघटनेकडुन आढावा घेण्यात येईल नव्याने निवड झालेल्या सर्वच मान्यवरांनी संघटनेत काम करणेची संधी दिलेने राष्ट्रीय कोअर कमीटीचे आभार माणुन संघटनेचे संस्थापक , अध्यक्ष मा. संजयजी रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली निष्टेने काम करुन संघटन गतीमान करणे साठी योग्य पाऊले उचलुन भविष्यात सुशिक्षित बेरोजगार, भुमिहीन मजुर व असंघटीत क्षेत्रातील कामगार जेष्ट नागरीक , महिला तसेच जगाचा पोशिंदा शेतकरी राजा यांच्या न्याय हक्कासाठी लढणेचा व त्यांना न्याय मिळवुन देणे साठी शासकिय स्तरावर पाठपुरावा करणेचा मनोदय व्यक्त केला तसेच संघटनेची विचारधारा देशभर पोहचविण्यासाठी संघटनेची देश पातळीवर बांधणी करणेचा संकल्प केला.

    संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष मा. संजयजी रणदिवे साहेबानी यांनी मानवता हा एकच धर्म आणी आर्थिक मागास एकच जमात व त्यांचा सर्व पातळीवर सर्वांगिन विकास हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असुन संघटनेची हि विचारधारा सर्व दूर पोहचवुन सोशित वंचित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल करुन भारतीय सविंधानाचा आदर करुन आपले कार्य करीत रहाण्याचे आव्हान केले.

    तसेच आता संघटनेस मा ठाकुर सर , अनंतजी कळसे साहेब तसेच मा. पंडीतजी कांबळे साहेब यांच्या सारखे उच्च शिक्षित, समृध्द विचारधारा असणारे व राष्ट्रीय पातळीवर कार्य केलेले प्रगल्भ विचारांचे तसेच समाजकारण व प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेले जेष्ट अनुभवी नेतृत्व मिळालेने ते संघटनेच्या कार्याचा आलेख सतत चढता ठेवतील अशी अशा व्यक्त केली व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन संघटनेच्या भावी कार्याप्रती त्यांना शुभेच्छा दिल्या.

    उपस्थितांचे स्वागत मा. दाजी शिंदे साहेब यांनी केले , तर प्रस्तावना मा. विजया घुटुकडे मँडम यांनी मांडली , तसेच सर्व विषयाचे वाचन महासचिव मा. पंडीतजी कांबळे साहेब यांनी केले तर मा. सुजाता गलांडे मँडम यांनी सर्वांचे आभार मानले.