रेल्वे इंजिनचा धक्का लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

26

🔺महिलेशची ओळख अद्याप पटली नाही

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.27ऑक्टोबर):-वरून परभणीकडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनने दिनांक 25 ऑक्टोबर रोजी गेट नंबर सहा पोखर्णी स्टेशन थेते सायंकाळी पाचच्या सुमारास महिलेस धडक दिल्याने वृद्ध महिलेचे शरीर पूर्णपणे छिन-विछीन्न झाले आहे. या महिलेस उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड याठिकाणी शवच्छेदन करण्यास आनले आहे.पण तीची ओळख अद्यापही पटलेली नाही.

डोक्याला थोड्या फार प्रमाणात काळे केस, रंग सावळा ,उंची अंदाजे पाच फूट, गोंदलेले नाही, अंगावर जांभळ्या रंगाचे ब्लाउज, लाल रंगाची साडी, गळ्यात बारीक तुळशीपत्र असे असून या वर्नाची वृद्ध महिला कोणाच्या ओळखीचे असल्यास तात्काळ रेल्वे पोलीस एम. एस. पठाण यांच्याशी संपर्क साधावा 98 23 28 36 15.