बिलोली तालुक्यातील दोन प्रा.आरोग्य केंन्द्रास शासनाचा कायाकल्प पुरस्कार जाहिर

    35

    ?तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आले फळाला

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.27ऑक्टोबर):-वेळो वेळी शासन प्रशासन यांच्या कडून प्राप्त होणाऱ्या आदेशाची योग्यरित्या अमंल बजावणी करून विशेषतः ग्रामीण भागात रूग्णांना प्रार्थमिक सुविधा देणे याच सोबत इतर आखून दिलेल्या कामास प्राधान्य देत आपल्या कामाचा दर्जा कायम टिकून ठेवणे अशा अनेक बाबींवर शासनाच्या निकशा प्रमाणे पडताळणी करून महाराष्ट्र शासनाचा कायाकल्प पुरस्कार तालुक्यातील प्रार्थमिक आरोग्य केंन्द्र कुंडलवाडी व प्रा.आ.केंन्द्र रामतिर्थ(शंकरनगर)या केंन्द्रास जाहिर झाला आहे.या कामी पावलो पावली तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांचे मार्गदर्शन फळाला आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

    प्रा.आ.केंन्द्र कुंडलवाडी येथे डाँ.बालाजी सातमवाड,डाँ.विनोद माहुरे व प्रा.आ.केंन्द्र रामतिर्थ येथे डाँ.शंकरराव वाडीकर,डाँ.विवेक बोरसे हे कार्यरत आहेत.शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमा अंतर्गत या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल शासनाच्या आरोग्य विभागाने घेतली आहे.

    यात किशोरवयीन मुलीची घेतल्या जाणारी काळजी,यशस्वीपणे करण्यात येणारे बाळांतपण व त्यांची संख्या,माता मृत्यू-बाल मृत्यूचे प्रमाण,गर्भ धारणा होण्या पासून मातेची घेतल्या जाणारी काळजी,स्वच्छता,कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अदिसह कामाचे ठेवण्यात आलेले रेकाँर्ड या बाबींच्या निकशा प्रमाणे हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

    या सोबतच तालुका आरोग्य अधिकारी वाडेकर यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळात अगदी रात्रंदिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळो वेळी सुचना देत कोरोनावर चांगल्या प्रमाणात मात केली आहे.या पुरस्काराच्या निमित्तानं विशेष मानले जाते.