गौळ (खु) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

42

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद (दि.27ऑक्टोबर):- तालुक्यातील मौजे गौळ खुर्द येथे चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी व ६४ वा धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नुतनीकरण करण्यात आले. विलासजी ढोले यांच्या तर्फे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा त्यांनी उपलब्ध करून दिला .त्याबद्दल सर्वांनी त्यांच्या सहकार्याबद्दल अभिनंदन करून विलासजी ढोले व लक्ष्मीबाई ढोले या पती-पत्नीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण पुसद विधानसभेचे लोकप्रिय युवा आमदार इंद्रनीलजी मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन होणे गरजेचे आहे.

या प्रसंगी माजी आमदार विजयराव खडसे, जि. प.उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर पाटील, ज्येष्ठ नेते गुरुसिंगजी नाईक, जि. प.सदस्य भोलेनाथ कांबळे, पोफळी ठाणेदार भगत साहेब, प.स.सदस्य देवेंद्रजी खडसे, उत्तमराव ढोले , गजानन फोपसे व गावकरी मंडळी व गावातील समस्त बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.