हेळंब सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे निधन

40

🔸प्रा.नारायण पाळवदे यांना पितृशोक

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.27ऑक्टोबर):- तालुक्यातील जेष्ठ राजकिय सामाजीक व्यक्ती हेळंब सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे दि.27 रोजी पहाटे चार वाजता निधन झाले.वैद्यनाथ महाविद्यालयातील प्रा.नारायण पाळवदे, प्रा.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे यांचे ते वडील आहेत.

परळी तालुक्यातील हेळंब येथील रहिवासी माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणुन ओळखले जायचे. गावच्या विकासात, ग्रामस्थांच्या सुख दुःखात सहभागी होवुन हेळंब गावचा विकास साधला. उपसरपंच, सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन व अनेक वर्षे संचालक म्हणुन काम करताना असंख्य शेतकर्यांच्या समस्या सोडवल्या.

वयाच्या 92 व्या वर्षी मंगळवार दि.27 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. तीन मुले व दोन मुली सुना,नातवंडे पणतु असा परिवार असुन परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते यांचे ते आजोबा होते.त्यांच्या पार्थिवावर दि.27 रोजी हेळंब येथेअंत्यसंस्कार करण्यात आले.