माहिती अधिकार कार्यकर्ता श्री. दिनानाथ काटकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल

32

🔹मा. न्यायमुती यांच्यामार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंञी यांना ईमेल द्वारे निवेदन

✒️शेगाव (पुरोगामी संदेश नेटवर्क)

शेगाव(दि.28ऑक्टोबर):- मागील अनेक वर्षापासून बार्शी,जिल्हा- सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काटकर हे जनहितार्थ माहितीचा अधिकार कायद्याबाबत जनजागृती तसेच कायद्याचा योग्य रीतीने वापर करून शासनातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम करीत आहेत.

श्री दीनानाथ काटकर यांसारखे कार्यकर्ते समाजामध्ये कार्यरत असणे काळाची गरज आहे ,ज्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट राजकारणी, मटका, भूखंड, माफिया, अवैद्य दारू इत्यादी अनेकांवर अंकुश देखील ठेवला जात आहे.मात्र त्यांचे कामाने ना खुश होऊन लोकांनी संघटित पणे षडयंत्र करून गेल्या काही महिन्यांपासून दीनानाथ काटकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

दीनानाथ काटकर यांच्यावर खोटे गुन्हे नोंदले जात आहेत अशा वेळेस प्रशासनाने योग्य तसेच उचित दखल घेणे अपेक्षित आहे. जेणेकरून भविष्यात भ्रष्टाचाराविरुद्ध काम करण्यात सामाजिक कार्यकर्तेसह जागरूक नागरिक देखील बळ मिळणे आवश्यक आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांच्यावरील गुन्हे ताबडतोब मागे घेतले जावेत व त्यांना आणि सर्व सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना/ लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता विशेष प्रयत्न व्हावेत ही विनंती व याबाबत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या मार्फत चौकशी करण्याकरिता विशेष प्रयत्न करावेत, अश्या मागण्या करणारे निवेदन मुख्यमंत्री यांना ई-मेल च्या माध्यमातून पाठविण्यात आले.

या निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य सरचिटणीस भिकाजी वरोकार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार,जिल्हा संघटक पंकज शाहु, शहर संघटक कुंदन इंगळे,तालुका प्रचार प्रमुख बाळकृष्णा भोजने, तालुका प्रमुख श्रीराम खोंड, रितेश टेकडीवाल व सदस्य यांच्या सहया आहेत.