दुचाकीवरून पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू

26

🔺ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.28 ऑक्टोबरल):- धावत्या दुचाकीवरून महिला पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिला बायजाबाई आत्राम (72) रा. गायडोंगरी त. ब्रम्हपुरी येथील रहिवाशी असून . बायजाबाई ही आठवडी बाजारकरिता तसेच बँकेमध्ये काम असल्याने गावाजवळ असलेल्या मेंडकी या गावला पायी जात असताना एका अनोळखी दुचाकी चालकाला लिफ्ट मागितली आणि काही अंतर जाता बायजाबाई दुचाकीवरून खाली पडली आणि ती जागीच मृत्यू पावली.

ही घटना 27 ऑक्टोबर ला जवळपास सकाळी 9.30 वाजता घडल्याचे सूत्राकडून माहीत झाली. तसेच अज्ञात दुचाकी वाहक पसार झाला आणि काही वेळानी लगेच मेंढकी पुलिस घटना स्थळी पोहचून मृतक महिलेची दखल घेतली. पुढील तपास मेंढकी पुलिस करीत आहेत.