बर्दापुरातील प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून केली विटंबना

    42

    ?आम्ही तुमच्या भावना समजू शकतो पण आपण संविधानाला माननारे माणसं आहोत असं म्हणून आंबेडकरी जनतेला शांत रहाण्याचे केले आवाहन- वंचितचे बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे

    ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

    अंबाजोगाई – केज (दि.28ऑक्टोबर):- अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करत दगड मारून तोडफोड केल्याची घटना दि २७ आॅक्टोंबर मंगळवार रोजी रात्री घडली.सदरील कृत्य जातीवादी मनुवादी विचारसरणीच्या अज्ञात गावगुंडांनी केले असून दोन्ही समाजात तेढ निर्माण करून महामानवाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे कृत्य घडले आहे.

    यामुळे बर्दापुर परिसरात तिव्र असंतोषाचे पडसाद उमटून संपूर्ण पंचक्रोशीतील आंबेडकरी प्रेमी जणता रस्त्यावर उतरून आंदोलनांच्या पावित्र्यात असून महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपींना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करण्यात यावे या करता आंबेडकरी जनतेने बर्दापुर येथील स्थानिक पोलीस स्टेशन समोर ठिया धरले आहे. या आंदोलनात वेगवेगळ्या आंबेडकरी संघटनांनी यात प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी ने राज्यभरात व जिल्हाभरात निषेध व्यक्त करत वरील कृत्य करणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या अज्ञात पिलावळींना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी.

    तसं न झाल्यास जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन व शासन जिम्मेदारी राहील या आशयाचे निवेदन यावेळी वंचित बहुजन आघाडी ने प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हा भरातील तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

    सदरील आंदोलनात आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे,उपजिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंदजी घाडगे, सुरेश बचुटे, देविदास बचुटे,गोरख गायकवाड, अॅड विलास लोखंडे, राहूलजी कासारे,सुशांतजी धावारे, तुकाराम देवळेकर, धम्मानंद कासारे,अमोलजी जोगदंड, बाबासाहेब मस्के परमेश्वर लांडगे यांच्यासह रिपब्लिकन सेना पक्ष,भीम आर्मी संघटना,युवा भीम सेना व इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

    मी तुमच्या भावना समजू शकतो पण आपण संविधानाला माननारे माणसं आहोत , फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानणारे माणसं आहोत आंबेडकरी जनता कधीही कुणाचं नुकसान करत नाही म्हणून आपण शांतता बाळगा शांत रहा असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे व जिल्हाउपाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांनी जणतेला शांत रहाण्याचे आवाहण केले आहे.