यापुढे सरकारने जर शेतकऱ्यांची थट्टा केली तर हातात दांडके घेऊन यावे

29

🔹बाबासाहेबराजे भोसले पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.28ऑक्टोबर):-छावा युवा संघटनेची राज्यस्तरीय आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यंकोजीराजे भोसले यांचे वंशज सरसेनापती बाबासाहेब राजे भोसले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडला.
यावेळी या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चालू असलेल्या ओल्या दुष्काळाचा मुद्दा तसेच महिला वरती वारंवार होत असलेले अत्याचार इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बाबासाहेब राजेभोसले बोलताना म्हणाले की आतापर्यंत कोणाचेही कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरीही ते शेतकऱ्यांची थट्टा उडवण्यासारख पॅकेज मंजूर केले आहेत जर यापुढे असेच चालत राहिले तर हातात दंडुके घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि हातात दंडुके घेऊन सरकारला धारेवर धरून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ तसेच संघटनेने आतापर्यंत वारंवार गृहमंत्र्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना महिलांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी बरीच वेळा निवेदने दिली असून याची दखल कुठेही घेतल्या गेली नाही.

असे निदर्शनास आले आहे जर निवेदनाची दखल घेत नसाल तर गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही छावा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब राजेभोसले यांनी दिला आहे यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष योगेश घोडके विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे पाटील प्रदेश उपाध्यक्ष अविनाश लोके साहेब प्रदेश उपाध्यक्ष गणेश बेंडभर प्रदेश संपर्कप्रमुख चेतन दादा पवळे मनीष भागडे राजेश ब्रिद महेश ब्रिद राजेंद्र चेडे मारुती पालांडे दादासाहेब निसाळ आशोक कंदुरकर राजेश कदम यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.