कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करने – बिलोली कोरोना दक्षता समिती ची मागणी

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)म:-9970631332

बिलोली(दि.28ऑक्टोबर):-येथील मागील आठ महिन्या पासुन शहरातील नागरिक कोरोना महामारीमुळे हैरान झाली आहे व रोजगार ठप्प झाले आहे कोरोना काळातील नल कर व मालमत्ता कर नगर पालिकेने माफ करण्याचे निवेदन कोरोना दक्षता समिती ने नगर पालिकेला लेखी निवेदना द्वारे करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे मार्च महिन्या पासुन लॉकडाउन करण्यात आला होता.मागील आठ महीण्यापासुन लॉकडाउन मुळे व्यापारी वर्ग व सर्व सामान्य रोज मजूरी करणाऱ्यावर त्यांची मार बसली असून सर्व सामान्य नागरिक कोरोनामुळे खुप अडचणीत आला असून जीवन जगने खुप अवघड झाले आहे. मागील आठ महिन्या पासुन शहरातील नागरिक कोरोना मुळे अडचणीत आले असल्याने कोरोना काळातील पाणी कर व मालमत्ता कर माफ करण्याची मागणीचे निवेदन मुख्यधिकारी व नगरध्यक्षा यांना नगर परिषद बिलोली यांना देण्यात आले.

यावेळी कोरोना दक्षता समितीचे विजय कुंचनवार, मौलाना अहमद बेग,जेष्ठ पत्रकार ए. जी.कुरैशी,शेख सुलेमान,व्यापारी व पत्रकार शेख फारुख अहमद,मुकींनदर कुड़के,सय्यद रियाज़ आदि उपस्थित होते.