नाली काढून न दिल्यामुळे शेतकऱ्याची लागली वाट

41

🔸ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची दुरवस्था

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.28ऑक्टोबर):- ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील शेतकरी रमेश बाळकृष्‍ण रासेकर यांची शेती ब्रह्मपुरी -आरमोरी राज्यमार्गावर आहे. रोडचे काम सुरू असताना ठेकेदारांनी आपल्या शेतातील नालीचे बांधकाम करून देतो म्हणून आश्वासन दिले होते. आई हंगामाच्या वेळी शेतकऱ्याला बनवाबनवी चे उत्तर देऊन चक्क फसविले आहे. शेतकरी रमेश रासेकर यांना त्या शेतातील धानपीक पूर्ण नष्ट झाला आहे. शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन दिले.

जुगनाळा सा.झा. क्र. 303 मधील धान पिक पूर्णपणे नष्ट झाली आहे. त्यांना खाण्यासाठी शेरभर सुद्धा धान होऊ शकत नाही. त्यांनी नेहमीच फोन द्वारे व प्रत्यक्षात भेटून ठेकेदाराची चर्चा केले. आज करतो, उद्या करतो असे वारंवार सांगून चक्क शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे. त्याच्या कर्तबगारीमुळे शेतकऱ्याला आज कुठल्या प्रकारचा धान पिक व अन्य पिक घेता आला नाही. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा केविलवाणा चेहरा पाहावत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर आता आपले काय होणार याकडे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याकरिता शेतकरी रमेश बाळकृष्ण रासेकर यांनी मागणी केली आहे.