कांद्याची वाहतूक करीत असल्याचे भासवित अवैध दारूची वाहतूक

29

🔺हिंगणघाट पोलिसांनी केले आरोपींना लाखोंच्या मुद्देमालासह अटक

🔺चंद्रपूर जिल्ह्यात येत होता दारु साठा

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.२८ऑक्टोबर):-कांदयाची वाहतुक करीत असल्याचे भासवीत अवैध दारुची मोठया प्रमाणात वाहतुक करीत असतांना सुमारे १२ लाख,१९ हजार रुपये किमतीचा दारुसाठा आज दि.२८ रोजी हिंगणघाट पोलिसांनी जप्त केला असून दोन आरोपीना दारुबंदी कायदयाअंतर्गत अटक केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन हिंगणघाट ते नंदोरी मार्गाने मोठया प्रमाणात दारुसाठायाची वाहतुक होत असल्याने पाळत ठेवली असता बोलोरो पिकअप या वाहनास संशयास्पद परिस्थितित ताब्यात घेतले.

नंदोरी रोडवरील निखाड़े मंगल कार्यालय परिसरात तपासणी केली असता या वाहनात कांदयाचे पोत्याचे आड़ देशी दारुच्या १२० कार्टूनमधे एकूण १२ हजार शिश्या जप्त करण्यात आल्या. यावेळी आरोपी मंगेश मदन अहेरवाल(२३)रा. रविदासनगर,मूर्तिजापुर तसेच बाबूलाल सिद्धार्थ सदानशिव(३०) रा.लंगापुर (पोई) ता.मूर्तिजापुर या अकोला जिल्ह्यातील आरोपींना अटक केली.

सदर आरोपी हा अवैध दारूसाठा चंद्रपुर जिल्ह्यात नेत असतांना हिंगणघाट पोलिस ठाण्याचे डीबी पथकाने ३०० किलो कांदा,दारुसाठा,बोलेरो वाहन क्र. एमएच १०-सिए ६१४९ तसेच एक मोबाइल संच असा एकूण १२ लाख,१९ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाई ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांचे मार्गदर्शनात पोहवा शेखर डोंगरे तसेच डीबी चमु यांनी केली.