आइकॉन बहुद्देशीय संस्थेतर्फे फिट इंडिया कार्यक्रम

59

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड़(दि.29ऑक्टोबर) ):-नेहरू युवा केन्द्र चंद्रपुर(युवा कार्यक्रम तथा खेल मंत्रालय भारत सरकार ) द्वारा पंतप्रधान यांनी घोषणा केलेल्या फिट इंडिया कार्यक्रम संपूर्ण भारतभर युवकांच्या,युवा मंडळाच्या माध्यमातून राबविन्यात येत आहे,त्यातच एक सहभाग म्हणून आइकॉन बहुद्देशीय संस्थेतर्फे तुकुम ता. नागभीड़ जिल्हा चंद्रपुर येथे युवकांच्या सहभागातुन फिट इंडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दैनंदिन जीवनात मानवाचे स्वताच्या आरोग्याकडे लक्ष देने कमी झाले आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात असाध्य अश्या रोगाला बळी पडतानां दिसत आहेत, त्यातच मानवी बदलत असलेली जीवनपध्दती ज्यात मानव जास्तीत जास्त रासायनिक पदार्थांने पिकवलेले प्रत्येक पदार्थ खातों की ज्यामुळे मानवाची रोगप्रतिकारशक्ति कमी होत चालली.यावर उपाय म्हणून मानवाला योग्य खानपान व त्याच बरोबर व्यायामाची गरज आहे जेने करुण रोगप्रतिकार शक्तित वाढ होईल,आणि असल्या प्रकारच्या कार्यक्रमामुळे प्रत्येक नागरिकाला नवचेतना मिळेल.

फिट इंडिया कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंगेश चौधरी(युवा प्रतिनिधि),वैभव श्रीरामे, बालाजी चौधरी सर,देवा दडमल ,मुख्य आयोजक पवन माटे(अध्यक्ष आइकॉन संस्था) यात गावातिल युवक ,शालेय विद्यार्थी,तसेच तुकुम तिवर्ला गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमानात सहभाग घेतला