चंद्रपूर जिल्ह्यात (दि.29ऑक्टोबर) रोजी गेल्या 24 तासात एकही कोरोना बाधिताचा मृत्यू नाही – 161 नव्याने कोरोना पॉझिटीव्ह

30

🔺जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 15438

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.29ऑक्टोबर):-जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 148 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 161 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 161 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 15 हजार 438 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 148 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 347 झाली आहे. सध्या 2 हजार 864 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 18 हजार 630 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख एक हजार 603 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 227 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 214, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली चार, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 161 बाधितांमध्ये 112 पुरुष व 49 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 53, पोंभुर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील सात, चिमूर तालुक्यातील पाच, मुल तालुक्यातील 14, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, कोरपना तालुक्यातील 18, ब्रह्मपुरी तालुक्यातील 17, नागभिड तालुक्यातील एक, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील पाच, राजुरा तालुक्यातील आठ तर गडचिरोली येथील सहा असे एकूण 161 बाधित पुढे आले आहे.