युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीच्या पुढे पाऊल : तृतीयपंथीय समूहातील सांरग पुणेकर यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

28

✒️ विजय कांबळे(विशेष प्रतिनिधी)मो:-8454021607

मुंबई(दि.29ऑक्टोबर):-राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात एलजीबीटी समुहासाठी स्वतंत्र विभाग सुरू करून, पक्षाने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रदेश युवक काँग्रेसनेही याहीपुढे जाऊन चांगला निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्यापदी तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या व समाजाच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या सारंग पुणेकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा तांबे यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या सारंग पुणेकर यांची थेट प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. एलजीबीटी समुहातील व्यक्तीला थेट पक्षाच्या मुख्य प्रवाहातच काम करण्याची संधी प्रदेश युवक काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे. समाजाने नाकारलेल्या तृतीय पंथीय वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय छान पुढाकार घेतला. त्यासाठी गेल्या महिन्यात पक्षात स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राजकीय क्षेत्रात या नियुक्तीमुळे सर्वच स्तरांतून चर्चा होत आहे.