विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीने निवेदन

47

🔸ओबीसी आरक्षण हा प्रमुख मुद्दा

✒️शिवानंद पांचाळ(नायगांव,शहर प्रतिनिधी)मो:-9960748682

नायगाव(दि.29आॅक्टोबर):-ओबीसी आरक्षण मधील घुसखोरी थांबली पाहिजे व देशातील ओबीसींची जातवार जनगणना झालीच पाहिजे,, यासारख्या महत्त्वपूर्ण बारा मागण्यांसाठी चे निवेदन कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे सादर केले.कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी ही माहिती दिली,, निवेदनात पुढे म्हटले आहे,, ओबीसी महाज्योतीला एक हजार कोटी मिळालेच पाहिजेत,, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे.

ओबीसीना सक्ती केलेली नॉन क्रिमिनल ची अट रद्द करावी,, ओबीसींना उच्च शिक्षणात आरक्षण मिळावे,ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप मिळाली पाहिजे,, राज्य सरकारच्या सेवेतील ओबीसीचा बॅकलोग भरावा.विदेशी उच्चशिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप सुरू करावी व अनुदान द्यावे ,,केंद्र व राज्य सरकारकडून ओबीसी संस्थेच्या प्रमाणात निधी मिळावा,, ओबीसीसाठी आश्रमशाळा सुरू कराव्यात व मंडल आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करावी.

अशा प्रकारची मागणी निवेदनात करण्यात आली आहे,, शासनाने या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर त्या पूर्ण कराव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे ,यावेळी दीनानाथ सुतार, प्रकाश सुतार विश्वनाथ सुतार ,रमेश सुतार ,तेजस सुतार,गणेश सुतार ,विजय कांडेकरी ,सूरज सुतार, तुषार थोरात ,मनोज लोहार,योगेश लोहार, वैभव गजबरे,भिमराव कागलकर व विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते.