हेळंबचे माजी सरपंच बालाजी आंधळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे परिसरात रा.काँग्रेस पार्टीला बळकटी मिळणार – भक्तराम फड

29

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.30ऑक्टोबर):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हेळंब गावचे माजी सरपंच बालाजी आंधळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाबद्दल स्वागत करून हेळंब व परिसरातील गावामध्ये राष्ट्रवादी पक्षास बळकट करण्यासाठी बालाजी आंधळे यांच्या प्रवेशामुळे आणखी बळकटी मिळणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते भक्तराम फड यांनी सांगितले आहे.

तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा हेळब ग्रामपंचायतचे १५ वर्ष सरपंच राहिलेले बालाजी आंधळे यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंद फड यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
ना. धनंजय मुंडे यांनी बालाजी आंधळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे फेटा बांधून पक्षात स्वागत केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भक्तराम फड म्हणाले की, हेळंब व परिसरात बालाजी आंधळे हे सर्वपरिचित आहेत. त्यांनी गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत देखील त्यांनी काम केले आहे. भाजपा पक्ष बळकट करण्यासाठी त्यांचे योगदान होते. भाजपाच्या एकाधिकारशाहीला कंटाळून बालाजी आंधळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपाचे आस्तित्वात या भागात समाप्त झाले. त्यांना राष्ट्रवादी मध्ये आणण्यासाठी मोलाची कामगीरी करणारे भोजनकवाडीचे ग्रां प स.उत्तम फड तसेच माजी सरपंच गोपाळ फड यांनी सुध्दा प्रयत्न केले.

आंधळे यांच्या प्रवेशासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यामुळे या भागात पक्ष बळकट करण्यासाठी मोठी ताकत मिळाली असल्याचे प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते भक्तराम फड यांनी दिली आहे.