मांडवा परिसरात वन्य प्राण्याच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त

33

🔹मांडवा शिवारात वानरांचा धुमाकूळ

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.30ऑक्टोबर):-तालुक्यातील मौजे मांडवा परिसरामध्ये मागील अनेक दिवसापासून वन्य प्राण्याचे हैदोसाने शेतकरी व मांडवावाशी त्रस्त झाले आहे.दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता वन्यप्राणीही हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी करीत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .सदर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक शेंबाळपिंपरी यांना मांडवा येथील शेकडो शेतकरी व मांडवावाशी यांनी शेकडो स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले आहे.

या निवेदनात मागील दीड ते दोन वर्षापासून वन्य प्राणी वानेरांचे कळप मांडवा येथे वास्तव्य करीत आहेत. व गावाशेजारील शेतांमध्ये कापूसांची बोंडे, तुर ,ज्वारी यांची नासाडी करीत आहेत .तसेच घरासमोरील असलेल्या परसबाग व फळबागाची नासधूस करीत आहे.

आणि गावांमध्ये घरावरती उड्या मारत आहेत .त्यामुळे घरावरच्या टीनावरील( पत्रावरील) दगड खाली पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे . त्यांच्या हैदोसामुळे गावातील कडूलिंब व इतर वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे .ह्या सर्व हानी टाळण्यासाठी वानेरे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मांडवा येथील शेकडो शेतकरी व मांडवावासी यांनी केली आहे.