कोरपना तालुक्यातील आदिलाबाद ते गडचांदूर महामार्गांवर पडले खड्डे

30

🔸राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणा करीत आहे दुर्लक्ष

✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी)

कोरपना(दि.31ऑक्टोबर):- हा आदिवासी दुर्गम भाग आहे तसेच कोरपना हा तालुका असल्यामुळे या तालुक्यामध्ये तहसील ऑफिस, पंचायत समिती तसेच पोलीस टेंशन सुद्धा आहे,त्यामुळे परिसरातील गावातील नागरिकांना आपल्या कामानिमित्त कोरपना येथे यावे लागते.

गेल्या दोन महिन्या पासून आदिलाबाद व गडचांदूर महामार्गांवर खड्डे पडले आहे तसेच लहान मोठया वाहनाला प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी या महा मार्गांवर शासन दुर्लक्ष करत आहे तसेच या मार्गांवर अनेक अपघात होत आहेत.

हा महामार्ग आता मरणाकडे पोहचण्यासाठी सोपा झाला आहे. ही गंभीर समस्या राजकीय पुढाऱ्यांना दिसत नाही का?असा प्रश्न नागरिक करीत आहेत. संबधित शासकीय अधिकारी व त्यांची यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन आहे . आता जनतेलाच पुढे यावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.