सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बाभळी बंधा-याचे १४ दरवाजे बंद

32

🔹त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंधाऱ्याचे दरवाजे बंद

🔸पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.31ऑक्टोबर):-येथून जवळच असलेल्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे २९ आँक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात आले. बंधारा झाल्यापासून सात वर्षात दुस-यांदा परतीच्या पावसाने आँक्टोबर महिन्यात तुडुंब भरला असून बंधारा पुर्ण क्षमतेने भरणार असुन सध्याची पाणीपातळी ३३१.९०मीटर इतकी आहे. सध्या बंधाऱ्यात ०.४५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

महाराष्ट्र व तेलगंणा राज्यात बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद झाला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला.१ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात येतील व २९ आँक्टोबर रोजी दरवाजे बंद करावेत.तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी १ मार्च रोजी तेलगंणात सोडण्यात यावे असा निकाल दिला.या निकालानुसार २९ आँक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पहिला दरवाजा बंद करण्यात आला. सांयकाळी ५ वाजेपर्यंत हळूहळू चौदाही दरवाजे बंद करण्यात आले.

यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एन.श्रीनिवासन, तेलगंणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता डी.सुशील,आंध्रप्रदेश राज्यातील कार्यकारी अभियंता मोहनराव, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता पडवळकर,शाखा अभियंता एस.बी.देवकांबळे
,कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे,पोलीस निरीक्षक सोहन माछरे,बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव डॉ. बालाजी कोंपलवार,सहसचिव जी.पी.मिसाळे, सुनिता पाटील बाभळीकर,लक्ष्मण पाटील येताळे आदी जण उपस्थित होते.