थोर समाजसुधारक व आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले

    38

    ?प्रा.टी. पी.मुंडे यांच्याकडून संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांना श्रद्धांजली

    ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.1नोव्हेंबर):-बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख, बालब्रह्मचारी, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याने लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले.

    वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते.  

    डॉ. रामरावजी महाराज हे आमचे मार्गदर्शक होते व त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी होता. त्यांच्या दर्शनाने नेहमी एका वेगळ्याच समाधानाची अनुभूति होत असे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे, या शब्दांत लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.