नांदेड मध्ये काॅग्रेस तर्फे ट्रॅक्टर रॅली व सत्याग्रह आंदोलन

35

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.1नोव्हेंबर):- केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार कायद्यांच्या विरोधात आज नांदेड येथे किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. यांचा निषेध म्हणून नांदेड शहर व जिल्हा काॅंग्रेसच्या वतीने शनिवारी प्रतिकात्मक ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली व त्यानंतर गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री नांदेड मा.ना. अशोकराव चव्हाण साहेब, महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, माजी खा. सुभाषराव वानखेडे, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखाताई चव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिणीताई येवनकर, जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.